दुर्गम भागातील शाळकरी मुलांच्या पंखांना बळ!

‘एक उम्मीद’कडून सायकल : लोखंडे शाळेतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

नाणे मावळ – कै. उषाताई लोखंडे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे संचलित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात एक उम्मीद सोशल फाउंडेशन पुणे व रोटरी क्‍लब ऑफ पुणे होरायझन यांच्या वतीने 22 मुला-मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

डोंगरी, दुर्गम भागातील या शाळेत आसपासच्या 5 ते 6 गावातील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. शाळेत जाण्या-येण्यासाठी दळणवळणाची साधने नसल्याने या विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करीत शाळेत यावे लागत असे. त्यातच त्यांची उर्जा खर्च होवून शारिरीक थकवा येत असल्याने अभ्यासावर, शैक्षणिक गुणवत्तेवर व आरोग्यावर विपरीत परिणाम होत असे ही बाब लक्षात घेवून कामशेत येथील “गगन न्यूलाईफ स्पेस’च्या संचालिका डिंपल सोमजी यांच्या प्रयत्नातून “एक उम्मीद’ या संस्थेच्या वतीने खांडसी, नेसावे, वेल्हवळी या दूर अंतरावरून येणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना 22 सायकलचे वितरण करण्यात आले.

तसेच यानंतरही उर्वरित विद्यार्थ्यांनाही भविष्यात सायकल वितरण करण्याचे आश्‍वासन एक उम्मीद संस्थेचे कार्यकारी संचालक अमित शाह यांनी दिले आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनिष कोठारी, बलजीत सिंग, माहिपाल कोठारी, शहजादजी हे होते. तर अध्यक्षस्थानी अमितजी शाह हे होते. शाळेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन अंबादास गर्जे यांनी केले. सुनीता वंजारी यांनी मानले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.