Pune Crime : सामजिक सुरक्षा विभागाकडून 17.50 लाखाचे बनावट हॉकिन्स कुकर जप्त

पोलिस आयुक्तांना मिळाली होती माहिती : पॉलिकॅबनंतर हॉकिन्सचा मोठा साठा जप्त

पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉलिकॅबनंतर आता नामांकित अश्‍या हॉकिंन्स कंपनीचे बनावट कुकर तयार करून विक्री करणाऱ्या दुकानावर छापे टाकले. दुकानातून साडे सतरा लाख रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे. मध्यवस्तीती पेठेत हा प्रकार सुरु होता.

याप्रकरणी दिलीप फुलचंद कोठारी (वय 56, रा. मंगळवार पेठ) व विनोद तखतमल जैन (वय 61, रा. शुक्रवार पेठ) यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉकिंन्स या नामांकित कंपनीचे बनावट कुकर तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाला कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली.

सामाजिक सुरक्षा पथकाने अचानक शुक्रवार पेठेतील टी. एफ. कोठारी या दुकानात आणि फुरसुंगी परिसरात असलेल्या गोडाऊनमधील श्री. शंखेश्वर युटेन्सिल्स अँड अप्लायन्सेस प्रा. ली. येथे एकाच वेळी छापा टाकला.

त्यावेळी पोलिसांनी प्रेशर कुकरचे 1 हजार 284 नग असा एकूण 17 लाख 45 हजार 955 रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच नवीन माल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 5 हजार लोगो आणि कागदी रॅपरही हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कॉपी राईटचा गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक श्रीधर खडके, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अण्णा माने, हणमंत कांबळे, मनीषा पुकाळे, नीलम शिंदे, संदीप कोळगे, संतोष भांडवलकर, प्रफुल्ल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.