मुंबई : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. भारतीय जनता पार्टी ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असून त्यांच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नसल्याचा टोला लगावला होता. त्यावर महाराष्ट्र भाजपानेही शरद पवारांवर खोचक टीका ट्विटद्वारे केली होती.
वाह पवार साहेब वाह!
आता तरी तुम्हाला आपत्ती आणि संपत्ती यातील फरक समजेल, हीच अपेक्षा!!! pic.twitter.com/DEIF0wGBI6— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 12, 2020
दरम्यान, याच ट्विटला उत्तर भाजप पक्षाने ट्विट करत शरद पवारांवर खोचक टीका केली आहे, ‘वाह पवार साहेब वाह!, ३०३ जागा जिंकणारी भाजपा ही राष्ट्रीय आपत्ती अन् ५ जागा जिंकणारी राष्ट्रवादी ही राष्ट्रीय संपत्ती! काय लॉजिक आहे. आता तरी तुम्हाला आपत्ती आणि संपत्ती यातील फरक समजेल हीच अपेक्षा आहे असं ही लिहिले आहे.