सोशल मीडियावर गुरूपौर्णिमेची धामधूम (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

आज गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या जीवनात गुरूंचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम गुरु करत असतो. प्रत्येक जण हा दिवस आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो. केवळ शिक्षकच नव्हे तर आपल्या आयुष्यात भेटणार प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो.

लहानपणी आपण गुरुपौर्णिमेच्या दिनी शाळेतील शिक्षकांना गुलाब किंवा नारळ देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. परंतु जसे आपण मोठे होत जातो. तसे आपल्याला शिक्षकांच्या संपर्कात राहता येईलच असे होत नाही. परंतु आज सोशल मीडियाच्या जगात हे शक्य झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. ज्यांना प्रत्यक्ष भेटता येत नाही. त्यांच्याशी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहतो. संपूर्ण जग ऑनलाईन होत असताना गुरुपौर्णिमाही आता ऑनलाईन झाली आहे. या दिवशी आपण फेसबुक, व्हॉटस् अॅप सारख्या माध्यमातून आपल्या गुरूप्रती असणाऱ्या भावना मेसेजद्वारा व्यक्त करत असतो. कोणी फोटो तर कोणी त्यांच्याविषयीची पोस्ट लिहून गुरूंना वंदन करत असते.

आज गुरुपौर्णिमा असल्याने सकाळपासूनच सोशल मीडियावर गुरुपौर्णिमेची धामधूम सुरु झाली आहे. प्रत्येक जण आपआपल्या गुरूंना वंदन करत आहे. त्यातच गुरूपौर्णिमेनिमित्त पुढील मेसेज आज व्हायरल होत आहे.

 “ गुरुपौर्णिमा” 

ज्यांनी मला घडवलं, 

या जीवनात मला जगायला शिकवलं, 

लढायला शिकवलं, 

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… 

असेच माझ्या पाठीशी उभे रहा, 

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. 

मग तो लहान असो व मोठा.. 

मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. 

अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!!!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

– श्वेता शिगवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)