बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवन यांच्या आगामी “कुली नंबर 1′ चित्रपटातील “तुझ को मिर्ची लगी…’ गाण्याचा ट्रॅक रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात दोघेही सुरुवातीपासूनच धमाल करताना दिसत आहे.
View this post on Instagram
“मिर्ची लगी तो’ गाण्यात सारा अली खान आणि वरुण धवन यांचा डान्स आणि दोघांची केमिस्ट्री खूपच जबरदस्त असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे गाणे रिलीज होताच काही वेळातच याला सुमारे 2 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या व्हिडिओत वरुण आणि सारा धमाकेदार पद्धतीने थिरकताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
हे गाणे अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायले असून आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले आहे. या गाण्याबद्दल डेव्हिड धवन म्हणाले की, मूळ “कुली नंबर 1′ ची गाणी खूप लोकप्रिय आणि सदाबहार आहेत. यामुळे मला वाटते की, ही गाणी चित्रपटाला हमखास यश मिळवून देतील.
View this post on Instagram
तसेच मी कोणत्याही चित्रपटाचा रिमेक करताना ब्लॉकबस्टर गाणी घेणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, “कुली नंबन 1′ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram