सामाजिक बांधिलकी जपणारे जोशी हॉस्पिटल

वैद्यकिय क्षेत्रात व्यवसायिकतेबरोबर सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना योग्य उपचार व अल्प फायदा घेत केलेली सेवा निश्‍चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे फक्‍त फलटण तालुकाच नव्हे, तर पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जोशी हॉस्पिटलचा नावलौकिक आहे. पुणे विद्यापिठातून सुवर्णपदक (1998) मिळवून एम.एस.ऑर्थोपेडीक्‍स झालेल्या डॉ. प्रसाद जोशी यांनी सुरुवातीस घरात क्‍लिनीक सुरु केले. त्यानंतर भाड्याच्या जागेत व मग स्वतःच्या मालकीच्या प्रशस्त इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असणारे हॉस्पिटल उभारले. डॉ. जोशी यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जोशी हॉस्पिटलचे नाव पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण भागातही प्रसिद्ध झाले आहे.

जोशी हॉस्पिटलची विविध क्षेत्रात कामगिरी ही कौतुकास्पद असून कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रियेत एक वेगळा मार्ग मिळाला. या सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी अधिक जिज्ञासा आणि माहिती मिळवून देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नी. क्‍लबचे उद्‌घाटन गेल्या तीन वर्षापूर्वी करण्यात आले. हा असा वेगळा उपक्रम राबवण्याचा आणि या उपक्रमामधून सांध्याविषयी असणाऱ्या तक्रारी तसेच त्यावर उपाय आणि शस्त्रक्रिया याविषयी माहिती उपलब्ध करुन डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन करुन दुखण्याने त्रस्त रुग्णांना दिलासा दिला. या क्‍लब मध्ये जवळजवळ 50 सभासद असून हे सभासद कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया करुन घेऊन समाजासमोर यशस्वी आणि अभिमानाने शस्त्रक्रियेमुळे झालेला फायदा तसेच एक उत्तम उदाहरण म्हणून डॉ. जोशी हॉस्पिटल यांचा गौरव व नावलौकिक केला गेला. दहिवडी तालुक्‍यातील आराध्य दैवत श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असताना त्यांच्या ट्रस्ट मधील तसेच त्या परिसरातील रुग्णांसाठी उपचार आणि शस्त्रक्रिया यामध्ये सेवा-सुविधा पुरवण्याची जिज्ञासा तसेच आत्मियता दिसून येते.

त्या भागातील रुग्णांना किफायतशीर उपचार पद्धती देणे, शस्त्रक्रियेमध्ये होणाऱ्या आर्थिक परिस्थितीमध्ये सवलत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. रुग्णांचा आर्थिक परिस्थिती अभावी होणाऱ्या उपचार पद्धतीचा योग्य तो वापर आणि आत्मसात केलेल्या शिक्षणाचा फायदा देण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो.वैद्यकिय क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला असून नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोगही केला जावू लागला. तसा उपचारांचा खर्च देखील वाढला, परंतु याला अपवाद फलटण येथील जोशी हॉस्पिटल आहे. डॉ.प्रसाद जोशी व डॉ. प्राची जोशी या डॉक्‍टर दांपत्याने वैद्यकिय क्षेत्रात व्यवसायिकते बरोबरच सामाजिकता जपत रुग्णांना योग्य उपचार व अल्प फायदा घेत केलेली सेवा निश्‍चितच वाखाणण्याजोगी आहे.

त्याचीच पोहोच पावती म्हणून जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण संस्थेला इंडियन ऍचिव्हर्स फोरम यांचेकडून “बेस्ट बिझनेस प्रॅक्‍टीसेस इन मेडिकल फिल्ड फॉर रुरल इंडिया’ असे राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक दिनांक 10 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथे इंडियन हॅबिटेट सेंटर येथे गुलमोहर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हे पारितोषिक मा. श्री. लक्ष्मी नारायण यादव, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकसभा यांच्या हस्ते प्रदान केला गेला. हा पुरस्कार फलटण सारख्या तालुकास्तरीय गावात राहून उत्तम वैद्यकिय सेवासुविधा देऊन सामाजिक बांधिलकी जपत नवीन-नवीन तंत्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. प्रसाद जोशी यांच्या नेत्रदीपक यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या सहचारिणी डॉ. प्राची जोशी यांचाही सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण हॉस्पिटलच्या प्रशासन विभागाची संपूर्ण धुरा त्या स्वत: सांभाळतात, त्यामुळे येणाऱ्या पेशंटला आवश्‍यक त्या सुविधा दिल्या जातात.जोशी हॉस्पिटलची विविध क्षेत्रात कामगिरी ही कौतुकास्पद आहे. या हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांवर देखील येथे चांगल्या पध्दतीचे उपचार होतात.

पेशंटशी सातत्याने संपर्कात राहिल्याने व संवाद साधल्याने हवे नको ते तत्परतेने पाहिले जात असल्याने पेशंटला आपल्या घरात असल्यासारखे वाटते, त्यामुळे सकारात्मक सुविधा, स्वच्छता व टापटिप त्याचबरोबर उत्तम वैद्यकीय सुविधेसह प्रशासन यंत्रणा राबविली जाते. रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. पूर्वी अपघातात एखादी व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास त्यास उपचारासाठी पुणे येथेच न्यावे लागत असे, त्यामुळे फलटण व परिसरातील रूग्णांची गैरसोय होत होती व तात्काळ उपचार मिळत नव्हते आणि हेच टाळण्यासाठी डॉ. प्रसाद जोशी यांनी फलटण येथे हॉस्पिटलची स्थापना करून त्यामध्ये ऍडव्हान्स ट्रामा केअर विभाग सुरू केला.

अनेकदा खेळताना, चालताना, पळताना अपघात घडतात किंवा इतर कारणांनी सांध्यातील बंध तुटल्यामुळे सांधा डळमळतो व संबंधित व्यक्‍तिला चालणे अवघड होते. या शस्त्रक्रियांद्वारे तुटलेल्या बंधांना व्यवस्थित बसवून पेशंट लवकरात लवकर बरा करण्याची सुविधाही जोशी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.

आधुनिक युगात वैद्यकिय प्रगतीमुळे मनुष्याचे आयुष्यमान वाढले आहे. त्यामुळे वयोवृद्धांची संख्या वाढत आहे. आज मोठ्या प्रमाणात ऐकायला व पहायला मिळणारी व्याधी म्हणजे सांधेदुखी व गुडघेदुखी (संधीवात) होय. यासाठी डॉ. प्रसाद व्ही. जोशी यांनी 2004 साली जोशी हॉस्पिटल प्रा. लि. यांचे बांधकाम केले. डॉ. प्रसाद व्ही. जोशी हे स्वतः या हॉस्पिटलचे चेअरमन असून ते स्वतः कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रियेचा अभ्यास करुन फलटणसारख्या ग्रामीण भागात या सोई-सुविधा उपलब्ध करुन सामान्य जनसमुदायास आधार दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×