हडपसर : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या परिसरात शहरातील सर्वाधिक कोविड रुग्णसंख्या आहे. शिवसेनेच्या माध्यमातून येथील भाग्यश्री एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये सेंट्रलाइज ऑक्सिजन सिस्टीम उभारून ३० बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांसाठी करण्यात आली आहे.
येथील मेडिकेअर हॉस्पिटल व्यवस्थापनच्या माध्यमातून येथे रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी दिली.नागरिकांची ऑक्सिजन बेडची गरज पहाता शिवसेनेचे पदाधिकारी समीर तुपे यांनी पुढाकार घेऊन हॉटेल भाग्यश्री एक्झिक्युटिव्हचे ३० बेड उपलब्ध करून दिले आहेत.
असे मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश राख यांनी सांगितले यावेळी डॉ. लाला गायकवाड, मेडिवेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश राख, डॉ. विराज सोनवणे, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ.स्वप्नील भाडळे उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून शिवसैनिक व मेडिकेअर हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून रुग्णांसाठी आवश्यक त्या व्यवस्था पूर्ण करूनमी माझे स्वतःचे हॉटेल कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी दिले आहे. याचे मला मोठे समाधान आहे. अशी भावना यावेळी हॉटेल भाग्यश्री एक्झिक्युटिव्हचे मालक तथा शिवसेनेचे उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी व्यक्त केली.