सामाजिक बहिष्कार, कौमार्य चाचणी ठरणार गुन्हा ; गृह राज्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

मुंबई: सामाजिक बहिष्कार, लैंगिक शोषण-अत्याचार, कौमार्य चाचणी आदी प्रकरणांची पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन गुन्हे नोंदवून कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीसांना दिले आहेत. तसेच सामाजिक बहिष्कार कायद्यातंर्गत दाखल असलेल्या सर्व प्रकरणांचा व त्यातील कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पोलिसांना दिल्या.

सामाजिक बहिष्कार कायद्यासंबंधी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आश्वासन तसेच विधान परिषद सदस्य डॉ. निलम गोऱ्हे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नितीमत्ता, सामाजिक स्वीकृती, राजकीय कल, लैंगिकता यांच्या आधारे किंवा इतर कोणत्याही कारणाच्या आधारे समाजातील सदस्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या व्यक्ति अथवा समूहाविरुद्ध सामाजिक बहिष्कार कायदा अंतर्गतच्या तरतुदीनुसार तक्रार दाखल करण्याचे तसेच अशा प्रकरणांमध्ये कौमार्य चाचणी ही लैंगिक शोषण-अत्याचार या अंतर्गत येते काय ही बाब तपासून तशी नोंद घ्यावी, याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश देण्याचे त्यांनी सांगितले.अशा प्रकरणांमध्ये संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई करण्यांचे आणि अशा प्रकरणांचा तिमाही आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी पुणे येथे घडलेल्या कौमार्य चाचणी प्रकरणाच्या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करण्यासाठी पोलीसांना सूचना देण्याची विनंती केली. कोरेगांव पार्क येथील प्रकरण, नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर व अकलूज येथील प्रकरणांवरही यावेळी चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)