…तर मग तिहेरी तलाक बंदी का नाही ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला सवाल

नवी दिल्ली : देशभरात आज 73 वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी देशातील अनेक मुद्यांवर भाषण केले. सरकारने तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यावरही घेतलेल्या निर्णयावर भाष्य करताना मुस्लीम महिलांची तिहेरी तलाक प्रथेच्या नावाखाली कुचंबना होत होती असे मोदींनी यावेळी म्हटले. जर आपण सती आणि बालविवाहसारख्या प्रथा रद्द करु शकतो तर मग तिहेरी तलाक का नाही? असा सवाल यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला.

मागील काही दिवसांपासून देशात अनेक मुद्दे गाजत आहेत. त्यातील तिहेरी तलाकचा मुद्दा अत्यंत संवेदनशील होता. त्यावर बोलताना तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांना खूप त्रास सहन करावा लागत होता. मुस्लीम महिलांच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. जर सती आणि बालविवाहसारख्या प्रथा रद्द करु शकतो तर तिहेरी तलाक का नाही ? असा सवाल यावेळी नरेंद्र मोदींनी विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दहशतवादावरही भाष्य केलं. दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.