…तर आम्हीबी हाय जिद्दी, ‘जंगजौहर’चा दमदार टिझर पाहिला का?

मुंबई – मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. लवकरच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, पावनखिंड गाजविणारे ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित ‘जंगजौहर’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकर येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, पोस्टरवर ‘ते फकस्त ६०० व्हते…’ ही दमदार टॅगलाईन देण्यात आली होती.

दरम्यान, आता ‘जंगजौहर’चा अधिकृत टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता ऋषी सक्सेनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर केला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अंगावर काटा आणणारी अनेक दृश्य असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)

पन्हाळगडाला सिद्दी मसूदने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. पाठलागावर असलेल्या विजापुरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले.

हजारोंच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. याची एक झलक या टीझरमध्ये दाखविण्यात आली आहे. जंगजौहर मध्ये मराठी सिनेसृष्टीला आघाडीचा अभिनेता ‘गश्मीर महाजनी’ नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.