…म्हणून उदयनराजेंना व्यंकय्या नायडूंकडून समज

पुणे – राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना शपथ दिली. शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, कॉंग्रेसचे राजीव सातव, मल्लिकार्जुन खरगे, भाजपाचे डॉ. भागवत कराड, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

दरम्यान, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची पहिल्यांदाच शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली यानंतर त्यांनी, “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली. यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

छत्रपती उदयनराजे भोसले यांना समज देताना व्यंकय्या नायडू म्हणाले की, ‘सदनातील नवीन सदस्यांना सांगतो की, हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाणार आहे. सदनात कोणतीही घोषणा देता येणार नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. दरम्यान आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.