…म्हणून यंदाचे अधिवेशन आहे खास – पंतप्रधान मोदी 

नवी दिल्ली – सतराव्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत असून हे अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालेल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेच्या चार नव्या सदस्यांचा शपथविधी होणार आहे. या अधिवेशनाची वैशिष्टये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, यंदाचे हे शेवटचे अधिवेशन असून खूपच महत्वाचे आहे. कारण राज्यसभेचे २५०वे अधिवेशन असणार आहे. तसेच आपल्या संविधानाला २६ तारखेला ७० वर्षे पूर्ण होत आहेत, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांत मी सर्वपक्षीय नेत्यांना भेटण्याची संधी दिली आहे. सर्व खासदारांनी चांगली चर्चा, विचार मांडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शिवसेना अखेर एनडीएमधून अधिकृतरित्या बाहेर पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घोषणा केली. विरोधी पक्षात असल्याने आता शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतील आसन व्यवस्थेतही बदल होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.