मुंबई – 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता शहीद कपूर याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात मोलकरणीची एक छोटीशी भूमिका साकरणारी मराठमोळी अभिनेत्री ‘वनिता खरात’ हिने आपल्या उत्तम अभिनयाने महाराष्ट्रातील फॅन्सच्या मनात मोठे घर निर्माण केले. तिच्या या अभिनयाची सर्वत्र जबरदस्त चर्चा झाली होती.
View this post on Instagram
प्रामुख्याने विनोदी भूमिकांमध्ये दिसणारी विनिता खरात सोशल मीडियावर सध्या एका फोटो मुळे जोरदार चर्चेत आली आहे. 2021 च्या पहिल्याच दिवशी खास बोल्ड अंदाजामधील एक फोटो शेअर केला. बघता बघता आता सोशल मीडीयामध्ये विनाच्या याच फोटोची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
View this post on Instagram
विनिताने शेअर केलेले न्यूड फोटोशूट हे एका स्तुत्य उपक्रमाचा भाग आहे. Body Positivity Movement चा संदेश देत या धर्तीवर एका कॅलेंडरसाठी हा फोटो आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकर याने हे फोटो शूट केले आहे. विनिताच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड अॅण्ड ब्युटिफूल अंदाज आवडला आहे.
View this post on Instagram
वनिता शरीरयष्टी स्थूल आहे. त्यामुळे तिने हे फोटोशूट करून बॉडि शेम करणाऱ्यांना संदेश दिला आहे. ‘मला माझ्यातील टॅलेंटचा, माझ्यातील प्रतिभेचा, आत्मविश्वासाचा अभिमान आहे. तसंच मला माझ्या शरीराचा देखील अभिमान आहे. कारण मी ‘मी’ आहे’, अशी पोस्ट वनिताने शेअर केली आहे.
View this post on Instagram