कोथरुड – जनतेला जे सरकार अपेक्षित होतं ते लोकांचे सरकार आता आले आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जेथे जातो तेथे उत्साह पाहायला मिळत आहे. हे लोकांचा सरकार आहे त्यामुळे शेवटची व्यक्ती जी आपल्यापर्यंत, मंत्रालयापर्यंत पोहचू शकत नाही त्यांचा आवाज ऐकण्यासाठी युवासेनेने सज्ज झाले पाहिजे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश पळसकर यांच्या कोथरुड मधील युवा सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपर्क प्रमुख बाळा कदम, गटनेते पृथ्वीराज सुतार, उपनेते रघुनाथ कुचिक, शहर प्रमुख संजय मोरे, कोथरुड विभाग प्रमुख उमेश भेलके व कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकांचं ऐकून काम करत आहेत ते स्वतःच्या मनातलं नाहीतर जन की बात बोलत आहेत म्हणून हे जनतेच सरकार आहे. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवसैनिकाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला येऊन आदित्य ठाकरे यांनी मला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणखी उर्जा दिली असल्याचे पळसकर यांनी सांगितले.
नेत्याचा मोठेपणा…
आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर प्रथमच कोथरूडमध्ये येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. फुलांची उधळण करत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे यांनी मोठेपणा दाखवत पळसकर यांनीच खुर्चीत बसावं असा आग्रह धरला पण पळसकर यांनी साहेब आपण आधी खुर्चीवर बसावं अशी विनंती केली. ठाकरे खुर्चीत बसले पण त्यांनी लगेच उठून पळसकर यांना खुर्चीत बसवून त्याच्या शेजारी उभे राहून फोटो काढले. या प्रकारामुळे उपस्थित सर्वच कार्यकर्ते गहिवरुन गेले.