मुंबई – बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत प्रवास केलेल्या प्रियांका चोप्राने तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिने उत्तम प्रकारे भूमिका साकारल्या आहेत. आतापर्यंत हिंदी चित्रपटातील तीन सर्वोत्कृष्ट भूमिकांची आठवण करुन प्रियांकाने त्याची नाव शेअर केली आहेत.
प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या चित्रपटाचे आणि तिच्या आवडत्या पात्रांचे नाव सांगितले आहे. ही अशी पात्रे आहेत जी तिच्या मते स्वत: खूपच शानदार आणि कॉम्प्लेक्स अशी पात्र होती. प्रियांका चोप्राने “बाजीराव मस्तानी’, “बर्फी’ आणि “सात खून माफ’ या चित्रपटाचे वर्णन तिच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रियांकाने पोस्टमध्ये लिहिले की, 3 शानदार आणि कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स जी मी पूर्ण जोमाने, संघर्ष आणि लवचिकतेने निभावली आहेत, अशा तीन उत्कृष्ट दिग्दर्शकांसह ज्यांच्यासाठी मला विश्वास आहे की ते स्वतः एक संस्था आहेत. संजय लीला भन्साळीची काशिबाई (बाजीराव मस्तानी), विशाल भारद्वाजची सुसन्ना (सात खून माफ) आणि अनुराग बासूची झिलमिल (बर्फी).
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास प्रियांका लवकरच “द व्हाइट टायगर’मध्ये राजकुमार रावसोबत दिसणार आहे. याशिवाय प्रियांका हॉलीवूड प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. अलीकडेच तिचा “वी कॅन बी हीरो’ हा हॉलीवूड चित्रपट रिलीज झाला आहे. तसेच “मॅट्रिक्स-4’मध्ये सध्या ती काम करत आहे.