नवी दिल्ली – एकीकडे जेथे केंद्र सरकार राज्य सरकार सातत्याने लोकांना मास्क लावणे आणि सोशल मीडिया डिस्टेन्सिंगचं पालन करण्यासाठी प्रेरित करीत आहे. तर दुसरीकडे मेरठमध्ये भाजपचा एक नेत्यान नागरिकांना मास्क लावण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. ]
मेरठ शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी होर्डिंग लावण्यात आला आहे. मात्र होर्डिंग पाहून वेगळाच संदेश दिला जात आहे. यावर दिलेल्या माहितीत असं लिहिलं आहे की, ‘जर तुम्ही स्वस्थ असाल तर मास्क लावण्याची आवश्यकता नाही.’ यामुळे सध्या या होर्डिंगचा सोशलवर फोटो चांगलाच व्हायरल झालं असून भाजप नेते देवेंद्र भुरंडा यांच्यावर चांगली टीका होत आहे.
सोशलवर त्यांच्या होर्डिंगचा फोटो शेअर करत युजर्स द्वारे भाजप पक्षावर टीका केली आहे. या होर्डिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो लावण्यात आले आहे. सोशलवर व्हायरल झालेल्या या होर्डिंगबाबत भुरंडा यांनी सांगितले की,”पार्टीचे सर्व लोक गाइडलाइन्सचं पालन करीत आहेत आणि मास्क व सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. मात्र ही चूक कळत झाली. असून अशी चूक कोणासोबतही होऊ शकते.’