मुंबई – बॉलिवुड अभिनेता शाहिद कपूर याचा या वर्षी “कबीर सिंह’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर तो आपल्या आगामी “जर्सी’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.
हा चित्रपट स्पोर्टस ड्रामावर आधारित असून त्याचे शूटिंग काही दिवसांतच चंदीगढ येथे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात शाहिदसोबत त्याचे वडिल पंकज कपूर सुद्धा झळकणार आहेत. मात्र शाहिदची प्रकृती स्थिर नसल्याने या चित्रपटाचे शूटींग लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळतेय.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शाहिदची प्रकृती ठीक नाही. डॉक्टरांनी त्याला काही काळ कम्प्लीट बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. सगळे प्रोजेक्ट तूर्तास थांबवण्याचाही सल्लाही त्याला देण्यात आला आहे. त्यामुळे ‘जर्सी’चे शूटींगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक गौमत टिन्नानूरी यांच्या “जर्सी’त शाहिदच्या ऑपोजिट मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या “जर्सी’चा हिंदी रीमेक आहे. तेलुगू चित्रपटात नवीन बाबू घंटा उर्फ नानी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.