… म्हणून नेटकऱ्यांनी खासदार जया बच्चन यांची घेतली शाळा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघाताचा देशातील सर्व स्तरातून निषेध व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यासाठी विरोधकांनी दिल्लीत निषेध व्यक्‍त केला. परंतु, यासर्वात  खासदार जया बच्चन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

भाजपचा आमदार कुलदीप सिंग सेंगर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. दोन दिवसांपुर्वी या प्रकरणातील पीडितेचा भीषण अपघात झाला परंतु, हा अपघात नसून घातपात असल्याचा अनेकांनी संशय व्यक्‍त केला आहे. त्याचाच निषेध आज विरोधकांनी नोंदवला. परंतु, सपाचे खासदार राम गोपाल आणि खासदार जया बच्चन यांचा निषेध नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला.

सध्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये जया बच्चन एवढ्या गंभीर विषयाचा निषेध सुरू असताना त्या आपल्या सहकार्यांसह थट्टा मस्करी करताना दिसत आहेत. ट्विटरवर सध्या त्यांचा हसण्याचा फोटो रि ट्विट करत युझर्सनी त्यांना शाब्दीक टोले दिले आहेत. उन्नावसारख्या घटनांचा निषेध हा जया बच्चन हसून व्यक्‍त करत आहेत असे एका युझरने म्हटले आहे. तर गंभीर दु:खद घटना हसत चर्चा आजचा ड्रामा असे एकाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)