…तर अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालनाच मिळणार; गॅसच्या वाढणाऱ्या किंमतीवरुन रोहित पवारांनी टोचले अर्थमंत्र्याचे कान

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमती मुळे आधिच सर्वसामान्याच्या खिशावर ताण पडतो आहे. असे असताना गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना सबसिडी देऊन सर्वसामान्यांच्या खर्चाला भार कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

सबसिडी देऊन सर्वसामान्यांच्या खर्चाला हातभार लावणार असेल तर अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालनाच मिळणार आहे. त्यामुळे गॅस सबसिडीसाठी दरवर्षी बजेटची तरतूद कमी करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मागणीच्या बाजूने विचार करून ती कशी वाढेल यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची रोहीत पवार यांनी मागणी केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, ”कोरोनाच्या फटक्याने घटलेलं उत्पन्न, वाढती महागाई अन बेरोजगारीच्या काळात गॅस सिलिंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळं आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. केंद्र सरकारने सिलिंडरसाठी देण्यात येणारं अनुदान पूर्ववत सुरु करून सामान्यांना दिलासा द्यायला हवा.

सिलिंडर कनेक्शन असलेल्या कुटुंबापैकी ८ कोटीहून अधिक कुटुंबं ‘बीपीएल’मधील असून ग्रामीण भागात निम्मे कुटुंबं अद्यापही चुलीवर स्वयंपाक करतात. या कुटुंबांना केवळ गॅस कनेक्शन देऊन भागणार नाही तर सवलतीच्या दरात सिलिंडर मिळण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना आखणं गरजेचं आहे.

सरकार जर सबसिडी देऊन सर्वसामान्यांच्या खर्चाला हातभार लावणार असेल तर अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालनाच मिळणार आहे. त्यामुळे गॅस सबसिडीसाठी दरवर्षी बजेटची तरतूद कमी करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मागणीच्या बाजूने विचार करून ती कशी वाढेल, यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.