…. म्हणून न्यायालयाने सपा आमदाराला सुनावली तीन तासांची कोठडी

नवी दिल्ली : मुरादाबादमधील कुंदरकी येथील समाजवादी पक्षाचे आमदार हाजी रिजवान यांना त्यांची छोटी चुक चांगलीच महागात पडली आहे. कारण त्यांच्या एका चुकीमुळे त्यांना चक्‍क कोठडीची हवा खावी लागली आहे.

शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आमदार रिजवान यांना 12 वर्षांपूर्वीच्या एका खटल्याप्रकरणी समन्स बजावले होते. आमदारांवर एप्रिल 2007 मध्ये मतदान करण्यास विरोध केल्याचा आरोप आहे. मतदान करण्यास विरोध करत काठीने मारहाण केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. गंभीर कलमे लावण्यात आलेल्या आमदार रिजवान यांना 2008 मध्ये उच्च न्यायालयाने जामीन दिला होता.

जेव्हा शनिवारी याची सुनावणी सुरु झाली. त्याचवेळी आमदारांना एक फोन आला. त्यावेळी नाराज न्यायालयाने आमदाराला कोठडीत आणण्याचे आदेश दिले. कोठडीत राहिल्यानंतर तीन तासांनंतर सोडून देण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.