…म्हणून ‘कायस्थ समाजा’ची ‘काॅमेडियन किंग’ने मागितली माफी

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘काॅमेडियन किंग’ अशी ओळख असणारा कपिल शर्माने नेहमीच चाहत्यांना हसवत असतो.  मात्र यावेळी  भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्माने सोशल मीडियाद्वारे कायस्थ समाजाची माफी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये हे घडले होते. ‘प्रिय कायस्थ समाज, २८ मार्च २०२०ला प्रदर्शित झालेल्या द कपिल शर्मा शोच्या एपिसोडमध्ये श्री चित्रगुप्त यांचा उल्लेख करण्यात आला होता. या उल्लेखाने तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी आणि माझी संपूर्ण टीम तुमची माफी मागतो’ असे कपिलने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.