“….तर मुख्यमंत्र्यानी स्वतःला मर्द म्हणू नये” पूजा चव्हाण प्रकरणी निलेश राणे आक्रमक

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे  यांनी महाविकास आघाडी सरकारवर तसेच मुख्यमंत्रांवर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधीही स्वत:च्या भाषणात मी मर्द आहे असं म्हणू नये असा टोला त्यांनी लगावला आहे असा ट्विट करत निलेश राणे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली  आहे.

काय म्हणाले निलेश राणे

ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही… परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.