…म्हणून सुशील कुमार मोदींचे ‘ते’ ट्विट ट्विटरने केले डिलीट

मुंबई – भाजपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे ट्विट ट्विटरकडून डिलीट करण्यात आले आहे. सुशील कुमार मोदी यांनी राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर सरकार पाडण्यासाठी कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, मोदी यांचे ट्विट आचारसंहितेचे भंग करत असल्याने ट्विटरकडून डिलीट करण्यात आले आहे.

सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करताना कॉलचा उल्लेख केला होता. त्यातच त्यांनी तो मोबाईल नंबरही शेअर केला होता. ट्विटमध्ये मोबाईल नंबर देणे ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग असून, त्या कारणामुळे ट्विटरने हे ट्विट डिलीट केले आहे.

काय आहे प्रकरण?

लालू प्रसाद यादव यांचा एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. कथित ऑडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार लालन पासवान यांना लालूंनी फोन केला होता. त्यावेळी या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडियो व्हायरल झाला आहे. त्यात लालूंनी अगोदर पासवान यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्याच्या ऐकू येते आहे. त्यानंतर बिहार विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पासवान यांना पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा सल्ला देताना दिसत आहे.

या प्रकरणावरून सुशील मोदी यांनी ट्‌वीटरवर एक फोन नंबरही शेअर केला असून त्यावरून लालू भाजपच्या आमदारांना फोन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित नंबरवर आपण फोन केला. तेव्हा पलिकडून लालूंचाच आवाज आला असा दावा करताना लालूंनी अशा गोष्टी थांबवाव्यात, असा त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.