…म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब – शरद पवार 

मुंबई – माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते.

शरद पवार म्हणाले कि, आज मी ईडीच्या कार्यालयात जाऊन काही विनंती करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यांनी जो गुन्हा दाखल केला. ज्या बँकेचा मी कधी संचालक नव्हतो. या प्रकरणी मी सहकार्य करण्यास तयार आहे. जो काही निर्णय घेतला तो राजकीय दृष्टीकोनातून घेतलेला आहे, असं आम्हाला वाटतं. ईडीने आम्हाला कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचं तसंच गरज असल्यास बोलावू असं सांगितले आहे. तसेच माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

पाठिंबा दिल्याबद्दल शरद पवार यांनी शिवसनेचे आभार मानले आहेत. तसंच आता पुण्यात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.