… तर सलमानवर बंदी घातली जाईल

पाकिस्तानने भारताबरोबरचे संबंध तोडले असतानाही पाकिस्तानमधील अब्जाधीशाच्या घरील विवाह सोहळ्यामध्ये कार्यक्रम सादर केल्याबद्दल पॉप गायक मिका सिंगवर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. मिकाच्या या कृत्याबद्दल “सिने वर्कर्स असोसिएशन’ आणि “फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने मिकावर बहिष्कार घातला आहे.

आता मिका बरोबर सगळ्यांनी काम करणे थांबवावे, असेही या संघटनेने म्हटले आहे. सिंगबरोबर जो कोणी काम करेल त्या तंत्रज्ञ, अभिनेता, गायक, वादक अथवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कोणावरही बंदी घातली जाईल, असा इशाराही या दोन्ही संघटनांनी दिला आहे. मात्र अभिनेता सलमान खान आता अडचणीत सापडला आहे. कारण सलमानने ह्युस्टन इथे आयोजित केलेल्या शो मध्ये मिका सिंगचा सहभाग निश्‍चित आहे.

मिकाला बरोबर घेऊन जर सलमानने ह्युस्टनमधील शो केलाच तर सलमानवरही बंदी घातली जाऊ शकते. सलमानला जर आपल्या कार्यक्रमातून मिकाला वगळायचेच असेल, तर त्याला थोड्या अवधीमध्ये मिकाच्या जागेवर दुसरा गायक कलाकार निवडावा लागणार आहे. त्यामुळे आपली देशभक्‍ती दाखवायची की मिका सिंगबरोबरची दोस्ती निभवायची, या पेचामध्ये सलमान पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.