मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना यांचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये सलमान भारतच्या प्रीमियर शोसाठी काल मंगळवारी रात्री आला होता. यावेळी आपल्या भाईजानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर प्रचंड गर्दी केली होती.
मात्र, गर्दीच्या वेळी सलमान खानच्या सुरक्षारक्षकांचा चाहत्यांना अडवण्याचा प्रयत्न चालू होता. आणि यावेळी त्याच्या बॉडीगार्डचा एका लहान मुलाला धक्का लागला. हे पाहून संतापलेल्या सलमानने थेट आपल्या बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली. सध्या सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Omg, @BeingSalmanKhan literally slapped a security guard for getting rough with a fan kid! #Bharat #SalmanKhan pic.twitter.com/05VFSRecmP
— ️️ ️️️️️️️️️ ️️ ️️ ️️ (@heartgetshurt) June 5, 2019