रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात.
झाडावर त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष., शास्त्रकारांनी रुद्राक्षाच्या अनेक प्रकारांची वर्णने केली आहेत. महती गायली आहे. रुद्राक्ष धारण करणार्यांनी त्याविषय़ी विचार करुन आपल्या अनुकुलतेनुसार निर्णय घेऊन रुद्राक्ष धारण करावा.
सर्व गात्रेण सौम्येन सामान्यानि विचक्षणः ।
निकर्षे हमरेखाभा यस्यरेखा प्रदृश्यते ॥
सर्व प्रकारे सौम्य, सुंदर तसेच स्वर्णित आभा असलेला रुद्राक्ष उत्तम असतो. सर्वश्रेष्ठ रुद्राक्षाचे रुप सांगताना रुद्राक्षजाबाल या उपनिषदाचे कथन आहे की “धात्रीफलप्रमाणं यच्छेष्ठमेतदुदाह्रुतम् ॥”
अर्थात आवळ्याप्रमाणे जो रुद्राक्ष असतो तो सर्वश्रेष्ठ म्हटला आहे. आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्णवीर्य व आयूकफनाषक आहे.
योगी लोकांच्या मते प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) निमय करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्ष मालेत) असते. रुद्राक्ष मालेने मंत्रसाधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते.
रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात. काही ग्रंथकारांच्या मते 1,3,5,9 व 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात.
एकमुखी रुद्राक्ष—-हे रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप असल्याचे मानले जाते. एकमुखी रुद्राक्ष जो कोणी वापरात असले त्याव्यक्तीच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते असे म्हणतात. याची देवता परमात्मा शिव आहे. व धारण करणारा काहीच दिवसात विरक्त होतो.
दोनमुखी रुद्राक्ष— हा रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते. शक्यतो पती पत्नी मधील ऐक्य, वैवाहिक सौख्य, दु:ख नाश, मनः शांती, उद्योगधंदा व प्रगतीसाठी हा धारण करतात . याने स्त्री रोग, नेत्र रोग आणि किडनी संबंधी आजार दूर होतात.
तीनमुखी रुद्राक्ष-— अग्नीरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही, आधी भावना आहे. हा धारण करणार्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. बुद्धी कुशाग्र होते.
चारमुखी रुद्राक्ष — याच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही. शिवाय ब्रम्हदेवचे प्रतीक. याचा प्रभाव धारण कर्त्याच्या जिभेवर होतो..अल्पावधीतच तो वक्ता साहेस्रेशू या पदविला पोहोचतो. नाक, कान व गळा संबंधी आजार, तसेच कुष्ठरोग, पक्षाघात, दमा इत्यादीसारख्या आजारांमध्ये फायदा होतो.
पाचमुखी रुद्राक्ष— हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यु येत नाही. तसेच यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. तरीही सहज उपलब्ध होतो म्हणून याकडे कोणीही लक्ष देत नाही. या रुद्राक्षामुळे किडनी, शुगर, लठ्ठपणा असे आजार बरे होतात.
सहामुखी रुद्राक्ष— कार्तिकेय स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो.. हा काही जण विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी लोक हा रुद्राक्ष वापरतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही. कुष्ठरोग, नपुंसकता, मूतखडा, किडनी आणि मूत्र रोग इतर आजारासाठी धारण करता येतं.
सप्तमुखी रुद्राक्ष— याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात. माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. दिर्घायुष्य व अपघातापासून रक्षण करतो. शारीरिक दुर्बलता, उदर रोग, पक्षाघात, काळजी, हाडाचे विकार, कर्करोग, दमा, कमजोरी इतर आजाराचा त्रास कमी होतो.
अष्टमुखी रुद्राक्ष— गणेशाचे प्रतीक. याला चिंतामणी रुद्राक्ष सुद्धा म्हणून ओळखले जाते. अशांती, सर्पभय, त्वचा रोग, गुप्त रोग इतर आजारावर चांगले काम करतो.
नऊमुखी रुद्राक्ष— काळभैरवाचे प्रतीक. दुर्गेचा पूर्ण आशीर्वाद. हा रुद्राक्ष धारण करणार्याच्या आसपास दु:ख दैन्य दारिद्र्य कधीच फिरकत नाही असा समाज आहे. फुफ्फुसासाठी, ताप, नेत्र रोग, संततीसाठी, ओटीपोटात वेदना, संक्रामकरोग शांतीसाठी धारण केला जातो.
दहामुखी रुद्राक्ष— जनार्दन स्वरूपात याची गणना होते, हा धारण केला तर तामसी शक्तिंपासून रक्षण होते. अनिष्ट ग्रह शांत होतात, फुफ्फुसासंबंधी आणि हृद्यासंबंधी आजारात आराम मिळतो.
अकरामुखी रुद्राक्ष— याच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रूद्र प्रसन्न होतात. हा अतिशय दुर्मिळ असून धारण कर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय करणारा ठरतो. स्त्री रोग, स्नायू रोग आणि वीर्य संबंधी आजार लाभ प्रदान करणारं ठरतं.
बारामुखी रुद्राक्ष— सूर्यस्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात. शत्रूघात व अपघातपासुन रक्षण होते. डोके दुखी, नेत्र रोग, ज्वर, हृदय रोग आणि मूत्राशय संबंधी आजारात फायदा मिळतो.
तेरामुखी रुद्राक्ष— याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते. याला इंद्राचा आशीर्वाद लाभला आहे. मूत्राशय, नपुंसकता, गर्भासंबंधी आजार, किडनी, लिव्हर संबंधी आजार दूर होण्यास मदत मिळते.
चौदामुखी रुद्राक्ष— रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात. तसेच हनुमानाचे प्रतीक. हा शेंडीत धारण करतात. योग विद्येत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करतात. वैराग्य, बेचैनी, भीती, पक्षाघात, कर्करोग, प्रेत बाधा अशा समस्यांवर लाभदायक ठरतं
पंधरावा गौरीशंकर रुद्राक्ष— एकाच देठावर दोन मणी काही वेळा सापडतात, किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात, त्यांना ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते.
रुद्राक्ष असा आणि कोणी धारण करावा
पक्ष-
शुक्ल पक्ष- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
तिथीं-
द्वितीयेला, पंचमी, सप्तमी, दशमी, त्रयोदशी, पौर्णिमा या तिथींना.
राशी-
मेष- त्रिमुखी, वृषभ- सहा मुखी, मिथुन- चारमुखी, कर्क- दोनमुखी, सिंह- एकमुखी, बारामुखी, कन्या- चारमुखी, तुला- षण्मुखी, वृश्चिक- त्रिमुखी, धनु- पाचमुखी, मकर- सातमुखी, कुंभ- सातमुखी, मीन- पाचमुखी सर्व साधारण हे प्रचलित आहेत.
रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी सात दिवस ते मोहरीच्या तेलात भिजवावे. यानंतर लाल धागा, चांदीची माळ या माध्यमातून तो धारण करावा.
रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी गंगाजलमिश्रित पंचामृत, पंचगव्य यांनी रुद्राक्षाला अभिषेक करावा. ते स्वच्छ करून घ्यावे. यानंतर ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्’ या दोन्ही मंत्रांचा १०८ वेळा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते.