पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्यानंतर रविवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांपर्यत देशभरात करोनाविरोधात सर्वजण एकत्रित लढा देवू असे चित्र निर्माण झाले होते. लॉकलाडनच्या काळात नागरिकांनी आप-आपल्या घराच्या बालकनींमध्ये मेणबत्ती आणि दिवे पेटविले होते. याप्रसंगी बॉलीवूड कलाकारांनी मेणबत्ती दिवे लावत करोनाविरोधात एकजुटीचा संदेश दिला. मात्र दिग्दर्शक राम गोपाल वर्माने जरा वेगळाच फोटो पोस्ट केला. त्यामुळे राम गोपाल वर्माची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
9 PM Disclaimer : Not following Corona warnings is far more dangerous than not following government warnings on cigarette smoking pic.twitter.com/Few9fyXhOg
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 5, 2020
राम गोपाल वर्माने ट्विट केले आहे की,’रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राम गोपाल वर्माने सिगारेट पेटवतानाचा फोटो ट्विट केला. या फोटोसोबत त्यांनी ‘धूम्रपानाबाबत सरकारच्या धोक्याच्या सूचनांचं पालन न करण्यापेक्षा करोनाबाबतच्या धोक्याच्या सूचनांचं पालन न करणं अधिक धोकादायक आहे’, अशा आशयाचं ट्विट केलं.
तसेच सिगारेट पेटवतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला. राम गोपाल वर्माने हे ट्विट केल्यापासून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून ट्रोल करण्याचाही प्रयत्न होत आहे.