…म्हणून पंतप्रधान मोदींनी बंगालमधील उद्याच्या सभा केल्या रद्द

नवी दिल्ली – देशातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला असून अनेक ठिकाणी रुग्णांना उपचारांअभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पश्चिम बंगाल येथील उद्याच्या नियोजित निवडणूक प्रचारसभांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलंय.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पश्चिम बंगाल येथील ४ जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रचार सभा घेणार होते. तेथे ते ५६  विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांचा प्रचार करणार होते. मात्र उद्या देशातील करोना परिस्थितीबाबतीतील एका महत्वाच्या बैठकीमध्ये उपस्थित रहायचे असल्याने  या नियोजित निवडणूक सभांमध्ये ते उपस्थिती लावणार नसल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.

दरम्यान, पांनतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभांना प्रत्यक्ष उपस्थिती लावणार नसले तरी ते सायंकाळी ५ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.