सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण विविध अपद्वारे औषध मागवत आहेत. बऱ्याच वेळा आॅनलाईन खरेदी काळजीपूर्वक न केल्यास त्याचा गैरफायदा घेत काही हॅकर्स आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on delivery) चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडावा.
यासंबंधी अनेक फसवणूकीची प्रकरण समोर येत असल्याने महाराष्ट्र सायबरने सर्व नागरिकांना विनंती केली आहे की अशा अँपद्वारे औषध मागविण्याआधी, सदर अँप वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा व मगच वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर स्टोअर करू नका .
तसेच सदर अँपवरून मागविलेली औषध डिलिव्हरी द्यायला घरी येतील तेव्हा तुम्ही मागविलेले औषध व डिलिव्हरीद्वारे आलेले औषध एकच आहे याची खात्री करा, शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on delivery) चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा .