मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. देशभरातून या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय पटलावर नेत्यांनी आपल्या भाषणात त्याचा अनेकदा उल्लेख केला, समाजमाध्यमांवर अनेक मते नोंदविण्यात आली. अनेकांना चित्रपटाच्या तिकिटासाठी झगडावे लागले. मात्र, आता चित्रपट रिलीज होऊन जवळपास आठ महिन्यांनी पुन्हा एकदा ‘द काश्मीर फाइल्स’ चर्चेत आला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करणार असल्याचं सांगितलं आहे. या संदर्भातील एक ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवर पोस्ट केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणतात… ‘द काश्मीर फाइल्स’ 19 जानेवारीला पुन्हा रिलीज होत आहे. तो दिवस म्हणजे काश्मिरी हिंदू नरसंहार दिन. वर्षातून दोनदा चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तुम्ही तो मोठ्या स्क्रीनवर पहिला नसेल तर, तुमची तिकिटे आत्ताच बुक करा”. असं ते म्हणाले आहेत.
ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles is re-releasing on 19th January – The Kashmiri Hindu Genocide Day. This is the first time ever a film is releasing twice in a year. If you missed watching it on BIG SCREEN, book your tickets NOW👇. https://t.co/LP0NKokbaehttps://t.co/J7s03w8P31 pic.twitter.com/TNxhq0L68V
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 18, 2023
दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या वर्षी 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ 20 ते 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटींहून अधिक कमाई केली. 1990 मधील काश्मिरी हिंदूंचे पलायन या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्या हत्याकांडाची कहाणीही सांगितली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.