मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. नातेवाईक असलेल्या या तरुणीने ओशिवारी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी म्हंटले कि, धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचे कबूल केले आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. याचा विपरित परिणाम समाजावर होणार आहे. यामुळे धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा उमा खापरे यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपातील काही नेते टेंशनमध्ये आले असतील, असे खोचक ट्विट काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत
कालपासून समाज…
Posted by Dhananjay Munde on Tuesday, January 12, 2021
धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मा आहे कोण? वाचा सविस्तर