“…म्हणून लोकशाहीला कधीही गृहित धरू नका”

अमृता फडणवीसांकडून कमला हॅरिस यांचा व्हिडीओ ट्विट

मुंबई : अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पेनसिल्वेनियातील २० निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी (सेनेटर) कमला हॅरिस यांनीदेखील इतिहास घडवला आहे. त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या असून त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कमला हॅरिस यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

“अगदी खरं आहे. लोकशाही ही एक स्थिती नाही, ती एक कृती आहे. याचा अर्थ असा की देशातील लोकशाहीची हमी दिली जात नाही. ही तितकीच मजबूत आहे जितकी त्यासाठी आपली लढण्याची इच्छा आहे. म्हणून त्याचं रक्षण करा आणि लोकशाहीला कधीही गृहित धरू नका,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांनी कमला हॅरिस यांचा एक व्हिडीओ ट्विट करत असा संदेश लिहिला आहे.

लोकप्रतिनिधी (सेनेटर) कमला हॅरिस यांनी इतिहास घडवला आहे. त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या आहेत. त्याचबरोबर त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष आहेत. बायडेन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.