म्हणून नरेंद्र मोदी इतरांच्या घरात डोकावतात- शरद पवार

मुंबई: अकलूज (ता़ माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर आपले मत व्यक्त केले. नरेंद्र मोदी म्हणाले, कुठल्याही व्यक्तीला परिवाराची साथ असणे ही मोठी ताकद आहे. परिवाराच्या विषयात शरद पवारांना माझ्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते त्यांची समज आणि संस्काराच्या अनुभवाने हे बोलत आहेत. मात्र त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या परिवाराकडून प्रेरणा घ्यायला हवी होती,असे मोदी म्हणाले.

दरम्यान शरद पवारांनी मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार चांगला माणूस आहे. मात्र त्यांच्या कौटुंबिक अडचणी आहेत. त्यांचा पुतण्या त्यांच्या हाताबाहेर आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की, माझ्या घरातल्या समस्यांचे तुमहाला काय करायचे आहे? पण मग मला जाणवलं की मला बायको आहे, मुलगी आहे, जावई आहेत, पुतणे आहेत. पण त्यांच्याकडे कोणीही नाही.

एक कुटुंब कसे चालवायचे हे मोदींना माहित नाही. म्हणून ते इतरांच्या घरात डोकावतात. मी आणखी काही बोलू शकतो परंतु मला पातळी सोडून बोलायचे नाही, असे शरद पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.