…म्हणून केला पत्नीचा खून 

पिंपरी – आजारी पडल्यानंतरही बघायला लवकर आली नाही या कारणास्तव आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा खून केला. फुगेवाडी येथे रविवारी झालेल्या खून प्रकरणामागील कारण पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

पूजा गोपाळ घेवंदे (वय 23, फुगेवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर, गोपाळ बबन घेवंदे (वय 28) असे जखमी मनोरुग्ण पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा घेवंदे या गरोदर असल्याने त्या आठव्या महिन्यात बाळांतपणासाठी माहेरी गेल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात गोपाळ वेडसरपणे वागत होता. तसेच तो आजारी पडल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले होते.

गोपाळ आजारी पडल्यानंतर तो पूजाला फोन करून बोलावत होता. मात्र, पूजा अवघडलेल्या स्थितीत असल्याने येण्यास तयार नव्हती. यामुळे त्या दोघांमध्ये शनिवारी (ता. 24) कडाक्‍याचे भांडणही झाले होते. शेवटी रविवारी पूजा गोपाळला पाहण्यासाठी आल्या. मात्र, पत्नी वेळेत आली नसल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातूनच पूजा चहा करत असताना त्याने पाठीमागून कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलीस पकडतील या भीतीने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.