मुंबई – महानायक अमिताभ बच्चन फक्त अभिनयासाठीच नाही तर आपल्या दमदार अँकरिंगसाठी देखील ओळखले जातात. अमिताभ यांचा भारदस्त आवाज आणि त्यांची शुद्ध हिंदी यामुळे कित्येकजण ते होस्ट करत असलेला कौन बनेगा करोडपती हा शो पाहतात. स्पर्धकाला प्रश्न विचारण्यासोबतच या शो दरम्यान अमिताभ बच्चन हे विविध विषयांवर टिपण्णी देखील करताना दिसताच. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न का केले याचा खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन या शो दरम्यान समोर बसलेल्या महिला स्पर्धकासोबत संवाद साधत होते. यावेळी बच्चन यांनी त्या महिलेला तुम्ही काय करता ? असा सवाल केला त्यावर महिलेने मी ब्युटी वेलनेसच्या इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. त्यावर बिग बी त्या महिलेला तुमचे केस खूप सुंदर असल्याचं म्हणतात तसेच केस दाखवणायचा आग्रह देखील करतात. महिलेचे सुंदर केस पाहून प्रेक्षकही टाळ्या वाजवतात. विशेष म्हणजे यावेळी अमिताभ आपण जया बच्चन यांच्यासोबत त्यांच्या सुंदर केसांमुळे लग्न केल्याचा खुलासा करतात.
यावेळी अमिताभ स्पर्धकाच्या केंसाकडे पाहून म्हणतात,मी माझ्या पत्नीसोबत लग्न यासाठी केलं होत की,त्यांचे केस खूप मोठे होते. प्रेक्षकांना देखील हे ऐकून आश्चर्य वाटते. अमिताभ आणि जया बच्चन यांचा विवाह १९७३ मध्ये झाले होते. इतक्या वर्षानंतर बिग बींनी आपल्या लग्नाचे सिक्रेट सगळ्यांनासमोर ठेवल्याने प्रेक्षकांनी देखील टाळ्यांचा कडकडाट केला.