पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचे पुणे शहरातील जागा वाटप ठरले असून, आठ मतदार संघापैकी चार राष्ट्रवादी, तीन कॉग्रेस तर एक मित्रपक्ष लढविणार असल्याचे राष्ट्रवादी पक्षांचे विधानसभा पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
रविवारी पुण्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी पवार बोलत होते. पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हडपसर, पवर्ती, वडगांव शेरी, खडकवासला, कॉग्रेसला कसबा, शिवाजीनगर, केन्टोन्मेंट तर कोथरूड मतदारसंघ मित्रपक्षाला सोडला जाणार आहे.