धारावीत आज आढळले ‘इतके’ कोरोना रुग्ण

मुंबई – अत्यंत दाट लोकवस्ती, अस्वच्छता, सार्वजनिक सौचालयांचा वापर अशी कोरोना संक्रमणाच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती असताना देखील धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने धारावी मॉडेलचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मात्र कालचा दिवस धारावीकरांसाठी चिंतेचा ठरला होता. काल येथे गेल्या चार आठवड्यातील सर्वाधिक २३ रुग्ण सापडले होते.

यानंतर आज धारावीमध्ये १३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून यामुळे एकूण रुग्णांची संख्या २४४८ इतकी झाली आहे. याबाबत बोलताना काल बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, धारावीतील २०६७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती दिली होती. या आकडेवारीनुसार धारावीत केवळ ९९ कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह असल्याचं स्पष्ट होतंय.

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून येथे कोरोनाचा पहिला रुग्ण १ एप्रिलरोजी सापडला होता. यानंतर साडेसहा लाख लोकवस्ती असलेल्या अडीच स्क्वेअर किलोमीटर भूभागावर वसलेल्या धारावीत ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबवण्यात आली होती.

घरोघरी जाऊन कोरोना लक्षणांबाबत चाचपणी करण्यात आल्याने येथील बाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून खाली येत असल्याचं दिसत आहे. धारावीसारख्या परिसरात प्रशासनाने उत्तम कामगिरी करून कोरोनाग्रस्तांची संख्या खाली आणल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कौतुक करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.