मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा हाहाकार मजला आहे. संकटाची सद्यस्थिती पाहता केंद्र सरकारतर्फे आज देशव्यापी लॉक डाऊनला आणखी २ आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सतत जनतेशी संवाद साधत आहे. कोरोनाविषयी माहिती, याचप्रमाणे नागरिकांच्या मनातील भीती मुख्यमंत्री ठाकरे हे घालवत असतात. प्रत्येक दिवसाचे अपडेट जनतेशी संवाद साधतांना देत आहे. जनतेचे मनोबल वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केलं आहे.
नमस्कार.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा.आज उद्धवजींनी टेलीविज़न वर सांगितले की या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत,हे ऐकुन समाधान वाटले.@OfficeofUT ,@AUThackeray
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 1, 2020
दरम्यान, लतादीदींनी ट्विटकरत म्हंटलं आहे की, ‘नमस्कार.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा. आज उद्धवजींनी सांगितले की, या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत, हे ऐकुन समाधान वाटले.’
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आजही ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोरानाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत. असे असले तरी आपण या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करत आहोत. मुंबई महापालिका ऑक्सीमीटरच्या सहाय्याने घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. आतापर्यंत २ लाखाहून अधिक तपासण्या झाल्या, ज्यात २७२ लोकांमध्ये ऑक्सीजनची कमी आणि इतर विकार असलेले रुग्ण सापडले.