…म्हणून केली BMC ने लता दीदींची इमारत सील

मुंबई – भारतरत्न, गान कोकिळा, गानसम्राज्ञी, ‘लतादीदी’ अर्थातच लता मंगेशकर राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’ इमारत मुंबई महानगरपालिकेकडून सील करण्यात आली आहे. लतादीदी यांच्या प्रभुकुंज इमारतीत तब्ब्ल 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही इमारत सील करण्यात आली आहे.

या सोसायटीत राहणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध व्यक्तींची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार आहे. तसेच सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे. प्रभुकुंज मध्ये लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर देखील राहतात.

दरम्यान, मंगेशकर कुटुंबियांकडून एक पत्रक काढून त्याबाबतची माहिती दिली आहे. यात म्हटलं आहे की, ‘आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. प्रभुकुंज सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. असं मंगेशकर कुटुंबियांनी परिपत्रकात म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्‍वगायिका असणाऱ्या लतादीदींनी विविध भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.