मुंबई – करण जोहरच्या “दोस्ताना 2’मधून बाहेर काढल्यापासून कार्तिक आर्यन सतत चर्चेत आहे. तो खूपच नाराज झाला आहे. त्याने तर वसन बाला यांच्या एका सुपरहिरोच्या “फॅंटम’ या फिल्ममध्ये काम करायलाही नकार दिला असल्याचे समजले आहे. त्याने अगदी विनम्रतेने या सिनेमात काम करायला नकार दिला आहे.
पूर्वी कार्तिकने या सिनेमात काम करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र क्रिएटिव्ह टीमबरोबर मतभेद झाल्याने त्याने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. “फॅंटम’चे प्रॉडक्शन रॉनी स्क्रूवालाच्या कंपनीकडून केले जाणार आहे. वसन बाला यांची डायरेक्शनची एक वेगळी स्टाईल आहे. त्यानुसार काही क्रिएटिव्ह बाबींची पूर्तता होणे आवश्यक होते.
मात्र कार्तिक आपल्या भूमिकेवर आडून बसला आणि अखेर त्याने हा सिनेमाही सोडण्याचा निर्णय घेतला. “फॅंटम’ ही एक सायन्स फिक्शन फिल्म असणार आहे. त्यासाठी मोठ्या बजेटची तरतूदही केली गेली आहे. हा सिनेमा सोडून कार्तिकने स्वतःचे करिअरच धोक्यात आणले अस्लयाची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.