नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षात सामील झाल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनंतर, द ग्रेट खली म्हणून प्रसिद्ध असलेले कुस्तीपटू दलीप सिंग राणा यांनी सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीने “प्रभावित” होऊन आपण भाजपमध्ये प्रदेश केल्याचे सांगितले. ते दिल्ली येथे बोलत होते.
भाजपमध्ये सामील झाल्याचा मला अभिमान असल्याचेही खली यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.
“मी डॉ जितेंद्र सिंग यांना भेटायला आलो होतो. आता मी परत जात आहे. मी त्यांना भेटायला आलो कारण ते देखील माझ्याप्रमाणेच हिमाचल प्रदेशातील आहेत. ही केवळ नियमित भेट होती,” अशी माहिती खली यांनी दिली.
यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारले असता खली यांनी, “भाजपमध्ये सामील झाल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.” असे उत्तर दिले.
सिंह यांच्याशी खलीची भेट औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी झाली आहे. तत्पूर्वी जितेंद्र सिंह, राज्यसभा खासदार अरुण सिंह आणि लोकसभा खासदार सुनीता दुग्गल यांच्या उपस्थितीत त्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता.
खली WWE युनिव्हर्समध्ये सुप्रसिद्ध आहे जिथे त्याने बॅटिस्टा, शॉन मायकेल्स आणि अगदी जॉन सीना आणि केन सारख्या व्यावसायिक कुस्तीपटूंशी लढा दिला आहे. 2021 च्या WWE हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. 7″1 उंची असलेले कुस्तीपटू खली यांनी, “MacGruber,” “Get Smart,” आणि “The Longest Yard” यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. भारतातील रेसलिंगची आवड असणाऱ्या युवा पुढच्या पिढीला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी कुस्तीची शाळा देखील उघडली आहे.
विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच खली यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता.