…म्हणून मी वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई- चित्रपटसृष्टीचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत 180 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू बिखरली आहे. बिग बींनी अनेक वेगवेळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

त्यामुळेच अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त बिग बींना त्यांच्या चाहत्याने विचारले आजच्या खास दिवशी तुम्ही काय करणार, तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करणार आहात? या प्रश्नांना उत्तर देताना अमिताभ म्हणाले, ‘वाढदिसांमध्ये साजरा करण्यासारखं काय असतं? सर्वसाधारण दिवसाप्रमाणे हा एक दिवस आहे. मी आजही काम करत आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ‘ असं ते म्हणाले. अमिताभ यांनी फॅन्सना त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विंनती केली.

Leave A Reply

Your email address will not be published.