मुंबई – सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची १९९१ पहिली भेट बेखुदी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर काही महिन्यातच सैफ आणि अमृता विवाहबंधनात अडकले. मात्र २००४ साली त्यांचा घटस्फोट झाला.
यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ साली सैफने करिना कपूरही लग्नगाठ बांधली. मात्र सोशल मीडियावर सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम खान नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याने वडील सैफ अली खानबरोबर एक फोटो शेअर केला आहे. एखाद्या पार्टीमधील हा फोटो आहे.
दरम्यान, या फोटोपेक्षा इब्राहिमने या फोटोला दिलेली कॅप्शन जास्त रंजक आहे. हा फोटो शेअर करताना इब्राहिम म्हणाला आहे की ‘मी आणि ओल्ड मॅन’. आजही अनेक तरूणींचा क्रश असलेल्या सैफ अली खानला त्याच्याच मुलाने म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांनी इब्राहिमच्या या कॅप्शनबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘सैफ अजिबात नाही आहे’, ‘सैफ जास्त हॉट आहे’, अशा प्रतिक्रिया तरूणींनी दिल्या आहेत.
इब्राहिम सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्याने त्याची आई अमृता सिंहबरोबरचा देखील फोटो पोस्ट केला होता. त्याच्या लहानपणीच्या या फोटोमध्ये देखील इब्राहिम खूप दिसत आहे. बहिण सारा अली खान बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवत असताना इब्राहिमने मात्र त्याच्या करिअरसंदर्भात कोणता खुलासा केला नाही आहे.