…तर मी स्वतः काश्मीरचा दौरा करेन – सरन्यायाधीश

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरसंबंधित एकूण ८ याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांना काश्‍मीरच्या चार जिल्ह्यांच्या दौऱ्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी ‘गरज पडल्यास मी स्वतः काश्मीरचा दौरा करेन’, असे त्यांनी म्हंटले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर आता गुलाम नबी आझाद बारामुल्ला, अनंतनाग, श्रीनगर आणि जम्मू जिल्ह्यांचा दौरा करू शकणार आहेत. तसेच गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्यानंतर आपण कोणतीही सभा घेणार नाही असे न्यायालयास आश्वासन दिले आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुख अब्दुल्लाच्या अटकेसंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली. परंतु, फारुक अब्दुल्ला यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायदा (PSA) अंतर्गत कारवाई केली असल्याची माहिती केंद्र सरकारने न्यायालयाला दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.