….त्यामुळे मी मास्क लावला नाही ;राज ठाकरेंनी मास्क न लावण्याचे सांगतिले कारण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील हजर होते.  मात्र त्यावेळी मास्क घेतला नव्हता  त्यामुळे सर्वानी याविषयी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, राज ठाकरे यांना याबद्दल विचारला असता सगळ्यांनी मास्क लावला आहे, त्यामुळे मी लावला नाही असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.

करोनामुळे सर्वांनाचा मास्कचा वापर करण्यास सांगितले जात असून तुम्ही मास्क का लावला नाही असे विचारले असता राज ठाकरे यांनी सांगितलं की ,याचं कारण म्हणजे सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार हितेंद्र ठाकूर तसंच इतर नेते उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी यावेळी लॉकडान संपेल तेव्हा एक्झिट प्लॅन काय असेल अशी विचारणा केली. बैठकीनंतर त्यांनी लॉकडाउनमुळे राज्य सोडून गेलेल्या परप्रांतीयांना तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेतले जाऊ नये असा सल्ला दिला असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.