नवीदिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. ठीक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्म दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलिवूडमधून देखील अनेकांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत अनोखा स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगनाने पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून पंतप्रधान मोदींचे वर्णन करत त्यांच्या आयुष्यरूपी प्रवासाची सर्वांना आठवण करून दिली आहे. कंगनाने फोटो शेअर करून देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये कंगना पंतप्रधानांशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. कंगनाने इंस्टा स्टोरीवर लिहिले, ‘लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली माणूस बनण्यापर्यंतचा प्रवास किती अविश्वसनीय आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच आमची इच्छा आहे
तुम्ही राम, कृष्णा, गांधीसारखे अमर आहात. तुमचा वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार म्हणते… एक नेता म्हणून तुम्हाला आम्हाला भेटलात म्हणून धन्य झाले अशा आशयाची पोस्ट कंगनाने पंतप्रधान मोदींसाठी केली आहे.