मुंबई – ‘मसान’ चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता ‘विकी कौशल’ सगळ्यांसमोर आला मात्र, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातल्या विकीच्या ‘हाउज द जोश’ या डायलॉगमुळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाहीतर त्याच्या फॅनफॉलोइंगमध्येही मोठा जोश वाढला. सध्या अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला विकी त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष देतो.
विकी कौशल नियमित जिममध्ये जातो आणि तो स्ट्रेचिंगचे व्यायाम करतो. तसेच विकी पुलअप्स देखील करतो. तो डंबेल्स आणि वेट लिफ्टिंग करतो.
जिम बरोबर विकी कौशल स्वीमिंगला ही तितकेच महत्व देतो. त्यामुळे तो नियमित पणे स्वीमिंग करतो. शिवाय तो दोरीचे व्यायामही करतो.
उरी चित्रपटल्या भूमिकेसाठी विकीनं 15 किलो वजन वाढवलं होतं. विकीचं डाएट फार कठीण नसतं. शरीराला पोषक मूल्य मिळतील याची विकी काळजी घेतो. तो दिवसात दर दोन तासांनी थोडं थोडं खातो.