मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा आता पोलिसांना बसत असल्याचे दिसत आहे. राज्यात आतापर्यंत ७८६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर सात जणांचा करोनाने बळी घेतला आहे. ७६ पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
786 police personnel have tested positive for #COVID19 in the state, of which 703 are active cases, 76 recovered & 7 deaths. There have been 200 incidents of assault on police personnel during the lockdown period & 732 accused have been arrested for the same: Maharashtra Police pic.twitter.com/BXT7FkqfHd
— ANI (@ANI) May 10, 2020
मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईत करोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिस करोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. संपर्कात आल्याने पोलिस कुटुंबीयांचेही विलगीकरण करावे लागत आहे.
मुंबईत चार पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर नवी मुंबई, सोलापूर आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात करोनाचे संकट दिवसागणिक आधिकच गडद होत आहे. करोनावर मात करण्यासाठी हॉटस्पटच्या ठिकाणी लॉकडाउन आणखी कडक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मात्र, नागरिकांमध्ये करोनाचे गांभीर्य दिसून येत नाही.