आतापर्यंत करोनामुळे 60 पोलिसांचा मृत्यू

मुंबई – राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबर पोलीस विभागातही करोनाचे दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मागील 24 तासांत राज्यात आणखी 82 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आले असून, एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील पोलिसांच्या मृतांचा आकडा 60वर पोहोचला आहे.

राज्यातील एकूण 4 हजार 938 पोलीस करोनाबाधित आढळले असून 2 हजार 600 पोलीस हे मुंबईतील आहे. यातील 3 हजार 813हून अधिक जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सद्यस्थितीत करोनाचा उपाचार सुरू असलेल्या पोलिसांची एकूण संख्या 1 हजार आहे. तर मुंबईती 38 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 60 पोलिसांना जीव गमावावा लागला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूविरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईत करोना योद्‌ध्यांची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांना दिवसेंदिवस करोनाचा ससंर्ग होत असल्याच दिसत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे यासाठी, आपल्या जीवाची पर्वा न करता करोना महामारीच्या संकट काळात पोलीस रस्त्यांवर चोवीस तास कर्तव्य बजावत आहे. असे असताना राज्यातील वाढत्या करोना संसर्गाचा आता त्यांना देखील अधिकच फटका बसत असल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.